
पोलिसांनी काँग्रेस आमदाराचा हा दावा फेटाळून लावलाय.
Arvind Kejriwal : पंजाब पोलिसांनी केजरीवालांना दिली Z+ सुरक्षा; काँग्रेस आमदाराचा दावा
चंदीगड : पंजाब सरकारनं (Punjab Government) अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना Z+ सुरक्षा दिली असल्याचा दावा काँग्रेस आमदार सुखपाल सिंह खैरा (Sukhpal Singh Khaira) यांनी केलाय. मात्र, पंजाब पोलिसांनी काँग्रेस आमदाराचा (Congress MLA) हा दावा फेटाळून लावलाय.
आमदार खैरा हे अखिल भारतीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांनी संरक्षित व्यक्तींची यादी प्रसिध्द केलीय. परंतु, पंजाब पोलिसांच्या (Punjab Police) प्रवक्त्यानं सांगितलं की, मीडियासमोर प्रसिध्द केलेला दस्तऐवज अधिकृत नाहीय. माजी उपमुख्यमंत्री ओपी सोनी यांनी हरियाणा उच्च न्यायालयात (Haryana High Court) दाखल केलेल्या रिट याचिकेचा हा एक भाग असल्याचं प्रवक्त्यानं नमूद केलंय.
हेही वाचा: सत्ताधारी पक्षाचे 38 आमदार भाजपच्या संपर्कात; मिथुनच्या दाव्यानंतर टीएमसीचं प्रत्युत्तर
प्रवक्त्यानं पुढं सांगितलं की, काँग्रेस नेत्यानं प्रसिध्द केलेली कागदपत्रं कोणत्याही प्रकारे पंजाब पोलिसांची अधिकृत कागदपत्रं नाहीयत. ती टाईप केलेली दस्तऐवज असल्याचं स्पष्टपणे दिसत असून त्यावर कोणतीही स्वाक्षरी, आद्याक्षरं, अधिकृत शिक्का किंवा अधिकृत प्रमाणपत्र नाहीय. ही यादी याचिकाकर्त्यानं टाईप करून रिट याचिकेसोबत जोडलेली दिसत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा: Iraq : इराकमध्येही श्रीलंकेसारखी परिस्थिती; आंदोलकांचा संसद भवनावर कब्जा
Web Title: Police Denied Congress Mla Sukhpal Singh Khaira Arvind Kejriwal Given Z Plus Security Punjab Government
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..