अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकी! हाय अलर्ट जारी

अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकी! अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर हाय अलर्ट
अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकी! अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर हाय अलर्ट
अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकी! अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर हाय अलर्टesakal
Summary

अयोध्येत बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिस हाय अलर्टवर आहेत.

अज्ञात व्यक्तीने अयोध्येत (Ayodhya) बॉम्बस्फोट (Explosive) करण्याची धमकी दिली आहे. अयोध्येत बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर उत्तर प्रदेश पोलिस (Police) हाय अलर्टवर आहेत. पोलिसांनी अयोध्येचे प्रवेशद्वार, हॉटेल, धर्मशाळा तसेच रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. एका अज्ञात व्यक्तीने डायल-112 वर कॉल करून ही धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे.

अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकी! अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर हाय अलर्ट
किती दूर आहे Omicron भारतापासून? 'या' देशांमध्ये आढळून आले रुग्ण

गेल्या महिन्याच्या सुरुवातीला यूपी पोलिसांना गुप्तचर यंत्रणेकडून सूचना मिळाली होती. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या नावाने मिळालेल्या धमकीच्या पत्रात लखनौ, अयोध्या, कानपूर, वाराणसीसह 46 रेल्वे स्थानकांना बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. गुप्तचर यंत्रणेच्या या अलर्टनंतर रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली. आरपीएफ, जीआरपी आणि पोलिसांव्यतिरिक्त श्वान पथकाने लखनौ, कानपूरसह अनेक रेल्वे स्थानकांचीही तपासणी केली. सखोल शोधमोहीमही राबविण्यात आली.

अयोध्येत बॉम्बस्फोटाची धमकी! अज्ञात व्यक्तीच्या फोननंतर हाय अलर्ट
'या' महिलेचं कसलं हे लग्नाचं व्यसन! स्वत:साठी शोधत आहे बारावा वर

ते धमकीचे पत्र लष्कर-ए-तोयबाच्या एरिया कमांडरच्या नावाने पाठवण्यात आले होते. याच दहशतवादी संघटनेने यापूर्वी 2018 मध्येही अशीच धमकी दिली होती. धमकी मिळाल्यानंतर अयोध्या स्थानकावरून जाणाऱ्या सर्व गाड्यांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com