नवऱयाचे बाहेर प्रेम प्रकरण सुरु आहे...

वृत्तसंस्था
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

नवऱयाचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू असलाच्या संशय पत्नीला होता. या संशयामधून पत्नीने उकळते तेल पतीच्या अंगावर फेकल्यामुळे पती 50 टक्के भाजला आहे. पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

बंगळूर: नवऱयाचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू असलाच्या संशय पत्नीला होता. या संशयामधून पत्नीने उकळते तेल पतीच्या अंगावर फेकल्यामुळे पती 50 टक्के भाजला आहे. पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मंजूनाथ व पद्माचा (वय 36) नऊ वर्षापूर्वी विवाह झाला आहे. आपल्या नवऱयाचे बाहेर प्रेम प्रकरण सुरू असल्याचा संशय पद्माला होता. या विषयावरून दोघांमध्ये सातत्याने भांडणे होत होती. रविवारी (ता. 9) सकाळी पुन्हा दोघांमध्ये भांडण झाले. पत्नीने उकळते तेल पतीच्या अंगावर फेकले. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने ओरडू लागला. शेजारी राहणाऱयांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. चेहऱा आणि छातीवर तेल पडले असून, तो 50 टक्के भाजला आहे.

विमानाने येऊन प्रेयसीला चॉकटेल देत लगावली थप्पड...

दरम्यान, यशवंतपूर पोलिसांनी पद्माला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

वहिणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले म्हणून...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman thinks husband is cheating on her throws boiling oil on him at bengaluru