प्रेमविवाह केला अन् कायमचाच निघून गेला...

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

प्रेयसीसोबत मोठ्या धुमधडाक्यात विवाह केला. विवाहानंतर घरी निघालेले नवविवाहित दांपत्य एका हॉटेलवर थांबले. नवरदेव एक मिनिटात आलो म्हणून गेला तो कायमचाच. जंगलामध्ये त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

बरेली (उत्तर प्रदेश): प्रेयसीसोबत मोठ्या धुमधडाक्यात विवाह केला. विवाहानंतर घरी निघालेले नवविवाहित दांपत्य एका हॉटेलवर थांबले. नवरदेव एक मिनिटात आलो म्हणून गेला तो कायमचाच. जंगलामध्ये त्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

स्नेहा काळजी घे, जास्त रडू नकोस...

दृष्यंत व आशाचा प्रेमविवाह झाला. विवाह झाल्यानंतर मोटारीमधून ते घरी निघाले होते. मोटारीमध्ये दोघांसह चालक व अन्य नातेवाईक होते. प्रवासादरम्यान एका हॉटेलवर ते नाष्टा करण्यासाठी थांबले होते. आनंदामध्ये सर्वजण रमले होते. सर्वांनी नाष्टा केला. यावेळी दृष्यंत एक मिनिटात आलो म्हणून बाजूला गेला. पण, बराच वेळ वाट पाहूनही तो परतला नाही. अखेर, सर्वांनी त्याचा शोध सूरू केला. पण, उशिरापर्यंत तो सापडला नाही. अखेर पोलिसांकडे तक्रार करून सर्वजण माघारी फिरले.

विवाहानंतर पाचव्याच दिवशी महिलेचे जुळले सुत अन्...

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर दुसऱया दिवशी दृष्यंतचा मृतदेह झाडाला लटकावलेल्या स्थितीत आढळून आला. घटनास्थळी दारूच्या बाटल्या व ग्लास आढळून आले आहेत. दृष्यंतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रियकर म्हणाला प्रेयसीला दुध प्यायचा का अन्...

कुटुंबियांनी दृष्यंतच्या खुनाची शक्यता वर्तविली आहे. प्रेमविवाह झाल्यामुळे तो प्रचंड खूष होता. त्यामुळे तो आत्महत्या करण्याची शक्यता नसल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे. घटनास्थळावरून दारूच्या बाटल्या व ग्लास ताब्यात घेण्यात आले असून, तपासासाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

माझी होणारी बायको पळाली; मी काय करू...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: brides body was found hanging in tree at uttar pradesh