परीक्षेला जाताना अडथळ्यांची शर्यत; पोलिस अधिकाऱ्याने मुलींना केली मदत

पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या मदतीमुळे मुली परीक्षा हॉल पर्यंत पोहोचू शकल्या.
Police Inspector helped student
Police Inspector helped studentSakal
Updated on

कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करत असतात. परंतु तरीही लोक पोलिसांना घाबरतात. शहाणा व्यक्ती पोलिसांपासून चार हात लांब राहणंच पसंत करतो. पंरतु पोलीस नेहमीच जनतेच्या सेवेसाठी तत्त्पर असतात. याची प्रचिती आली कोलकात्यातील दोन मुलींना आला. परीक्षा सुरु व्हायला दहा मिनिटे बाकी असतानाच गाडी खराब झाल्यामुळे रस्त्यात अडकून पडलेल्या दोन मुलींना एका पोलीस निरीक्षकाने वेळेत परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवलं. त्यामुळे या मुलींना परीक्षा देता आली. (Police helped the students to reach the examination center in Kolkata)

Police Inspector helped student
Photos: धोनीचा तीन फुटाचा घोडा; पाहा खास फोटो

सौमिक सेनगुप्ता असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते श्यामबझार वाहतूक नियंत्रण शाखेत कार्यरत आहेत. सकाळी 11.35 मिनिटांनी त्यांना हा प्रकार समजला. आरजी कार रोडवर त्यांना या विद्यार्थिनी त्यांच्या पालकांसमवेत दिसल्या. गाडी खराब झाल्यामुळे परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी इतर वाहन मिळतंय का यासाठी प्रयत्न करत होते. त्यांना डफ मार्गावरील सेंट मार्गारेट स्कूल मध्ये पोहोचायचं होतं, जे तिथून दोन किलोमीटर अंतरावर होतं आणि परीक्षा सुरु व्हायला फक्त दहाच मिनिटांचा कालावधी शिल्लक होता.

Police Inspector helped student
Photo Story: कुत्री गाडीच्या मागे का लागतात? जाणून घ्या कारणे

त्यानंतर सौमिक यांनी त्यांना स्वतः त्यांना परीक्षा केंद्रापर्यंत सोडलं आणि या दोन्ही मुलींना परीक्षा देता आली. "हा माझ्या ड्युटीचा भाग होता, मी या विद्यार्थीनींची मदत करू शकलो, याचा मला आनंद आहे",असं सेनगुप्ता यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com