राजकीय नेते कोविड औषधं बाळगू शकत नाहीत- हायकोर्ट

Court
CourtSakal

नवी दिल्ली- कोरोना (corona) महामारीचा प्रकोप सुरु असताना आरोग्य सुविधा कमी पडत आहेत. हॉस्पिटलमध्ये औषधांचा, ऑक्सिजनचा तुटवडा असल्याने लोकांचे हाल होत आहेत. अशात काही राजकीय नेते कोरोनावरील औषधांचे वाटप करत असल्याचे समोर आले होते. यापार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून दिल्ली पोलिसांना राजकीय नेत्यांकडे अशा औषधांचा साठा सापडल्यास तो जप्त करण्यास सांगितलं आहे. हॉस्पिटलमध्ये कोविड औषधांची कमतरता असताना राजकीय नेते अशी औषधं स्वत:जवळ बाळगू शकत नाहीत, असं हायकोर्टाने सुनावलं आहे. (Political leaders cannot hoard Covid19 medicines surrender stock health department Delhi HC)

राजकीय नेत्यांनी आपल्याजवळील कोविड औषधांचा साठा राज्य आरोग्य विभागाकडे जमा करण्यास कोर्टाने सांगितलं आहे. काही राजकीय नेते औषधे मोफतमध्ये वाटप करुन जाहीरात करत असतील, तर ते चुकीचं आहे. त्यांच्याकडे हे औषधं कोठून येताहेत? औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत आहेत. औषधांचे वाटप करण्याचा तुमच्याकडे परवाना आहे का? तुम्ही अशाप्रकारची कामे कशी हातात घेऊ शकता? असं न्यायमूर्ती विपिन संघी आणि जस्मित सिंग यांच्या पीठाने विचारले.

Court
मोदी सरकारवर नाराज; टास्क फोर्सच्या प्रमुखांचा राजीनामा

राजकीय नेते औषधांच्या पुरवठ्याचं भांडवल करत आहेत. औषधांचे वाटप लोकांच्या मदतीसाठी असून यातून कोणताही राजकीय लाभ मिळवणे हेतू नसल्याचं नेत्यांकडून सांगण्यात येतंय. पण, यावर विश्वास ठेवता येत नाही. राजकीय नेत्यांनी आपल्याजवळील औषधांचा साठा राज्य आरोग्य विभागाकडे जमा करावा. जेणेकरुन हा साठा गरजू लोकांना वाटला जाईल, असं हायकोर्टाने म्हटलंय.

Court
कोविडशी लढाई, गावांसाठी केंद्राने आखला विशेष प्लान

औषध दुकानदार इतक्या मोठ्या प्रमाणात औषधं राजकीय नेत्यांना कशाप्रकारे देत आहेत, याची चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. डीसीपी राजेश राव यांनी यावर लवकरच सविस्तर रिपोर्ट सादर करणार असल्याचं म्हटलंय. दरम्यान, राजकीय नेत्यांकडून अवैधरित्या औषधांचा पुरवठा होत असल्याची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील अनेक नेत्यांची चौकशी केली आहे. यात आपसह काँग्रेस नेत्यांचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com