हत्तिणीच्या मृत्यूला राजकीय रंग 

हत्तिणीच्या मृत्यूला राजकीय रंग 

नवी दिल्ली - केरळमध्ये गर्भवती हत्तिणीची हत्या करण्याच्या करण्याच्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून याची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा केली जाईल असे केंद्राने गुरुवारी स्पष्ट केले. या प्रकरणाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने, आजी माजी केंद्रीय मंत्र्यांनी केरळचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

केरळमधील सायलेंट व्हॅली भागात एका हत्तिणीला अननसात फटाके भरून खाऊ घातल्याने तिचा मृत्यू झाला. केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय पथक पाठवण्यात येणार असल्याचे वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. या प्रकरणाची तात्काळ आणि योग्य चौकशी करून केंद्र सरकार: दोषींना शिक्षा करेल असेही जावडेकर यांनी स्पष्ट केले. प्राण्यांची अशी हत्या करणे भारतीय संस्कृतीत बसत नसल्याचा टोला त्यांनी लगावला. 

राहुल गांधींवर निशाणा 
या प्रकरणावरून भाजपने अमेठीतून केरळच्या वायनाडमध्ये स्थलांतरित झालेले काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची संधी साधली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की राहुल गांधी यांच्याकडून संवेदनशीलतेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यांनी अमेठीमध्ये माणसांची पर्वा केली नाही ते केरळमध्ये जनावरांची काळजी कशी करतील. 

हत्तिणीचा हा खूनच 
वन्यजीव हक्कांसाठी काम करणाऱ्या माजी मंत्री मेनका गांधी यांनीही याप्रकरणी संताप व्यक्त केला. यावर काय कारवाई करणार हे राहुल गांधी यांनी सांगावे, असे सांगताना गांधी म्हणाल्या की हा खूनच आहे. केरळ देशातील सर्वात हिंसक राज्य असून येथे रस्त्यांवर हत्तींना मारणे हे नेहमीच घडणारे प्रकार आहे. या राज्यात तीनशे-चारशे पक्षी किंवा कुत्री एकदम मरून जावीत यासाठी लोक रस्त्यांवर सर्रास विष टाकतात, असे त्यांनी सांगितले. 

राहुल यांच्यावर नाहक टीका 
दरम्यान, केरळमध्ये जे घडले ते अत्यंत दु-खद आहे. मात्र याप्रकरणी राहुल गांधी यांना विनाकारण टीकेच्या पिंजऱ्यात अडकवले जात आहे. असे काँग्रेसने म्हटले आहे. 

मुक्या प्राण्यांना फटाके खाऊ घालून मारणे ही भारतीय संस्कृती नाही. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल 
प्रकाश जावडेकर, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com