यंदाही दिल्लीवर प्रदूषणाचे सावट

यंदाही दिल्लीवर प्रदूषणाचे सावट

नवी दिल्ली - कोरोनाचा कहर सुरूच असताना दिल्ली- एनसीआरसह पूर्ण उत्तर भारतात यंदा मागील तीन वर्षांपेक्षा जास्त वायुप्रदूषण होण्याची शक्‍यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. दिल्लीत प्रदूषणाला सुरुवातही झाली असून उपग्रहावरून मिळालेल्या छायाचित्रांनुसार पंजाबसह दिल्लीच्या शेजारच्या राज्यांमध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काडीकचरा शेतातच जाळण्यास सुरवात केली आहे. हे रोखण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी घेतलेल्या चारही राज्यांच्या बैठकांचा परिणाम यंदाही नगण्य दिसत आहे. 
वायुप्रदूषणाला तोंड देण्यासाठी रिस्पॉन्स एक्‍शन प्लॅननुसार (ग्रॅप) १५ ऑक्‍टोबरपासून दिल्ली परिक्षेत्रात डिझेल जनरेटवर पूर्ण बंदी राहणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मेट्रो व इतर मोठ्या योजनांच्या नवीन कामांसाठी दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच  नोएडा, गाझियाबाद, ग्रेटर नोएडा, फरिदाबाद व गुरुग्राम या भागांतही पर्यावरणाबाबतचे नियम पाळणे सक्तीचे असेल. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाने चारही राज्यांना पत्र लिहून पर्यावरण नियमांचे सक्तीने पालन करण्याची सूचना केली आहे. मागील वर्षीप्रमाणेच दिल्लीजवळच्या वीटभट्ट्या, नवीन बांधकामे, स्टोन क्रशर व हॉट मिक्‍स प्लॅंट यांच्यावर बंदी घालणे व ट्रक व जड वाहनांच्या प्रवेशास मनाई करणे भाग पडणार आहे.

कचऱ्याचा घातक धूर
अमृतसर, तरनतारन, पतियाळा, गुरदासपूर, फिरोजपूर, लुधियाना, संगरूर व फतेहगड साहिब या पंजाबच्या जवळपास सर्वच जिल्ह्यांत, हरियानातील कुरुक्षेत्र, कैथल, जिंद, फतेहाबाद, उत्तर प्रदेशात सीतापूर, मेरठ, अलीगड, बरेली, गाजीपूर, संभल, शामली, सहारनपूर या भागांत शेतातील काडीकचरा मोठ्या प्रमाणावर जाळण्यास सुरवात झाली आहे. पंजाबमध्ये हवेत   धूर येत असल्याचे उपग्रहाने टिपले आहे. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com