
भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार केला जात आहे. पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत कुरापती सुरू आहेत. गेल्या १४ दिवसांपासून पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार केला जात आहे. कुपवाडा, बारामुल्ला, उरी, अखनूरसह पूँछमध्ये पाकिस्तानी लष्कराने गोळीबार केला. यात १३ जणांचा मृत्यू झाला असून ५७ जण जखमी झाले आहेत. यात चार मुलांचा आणि एका जवानाचा समावेश आहे.