मुंबईत मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस तर कोकणात अतिवृष्टी!

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 September 2019

मंगळवारपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसतील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे.

मुंबई : गौरी विसर्जनावेळी आवर्जून हजेरी लावलेल्या वरुणराजाने रविवारी लपंडावाचा खेळ मांडला. सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देतानाही वरुणराजाने सायंकाळी आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे सात दिवसांच्या गणपतीला निरोप देणाऱ्या गणेशभक्तांनाही वरुणराजाने वृष्टी केली. मंगळवारपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी बरसतील, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, सोमवारी मुंबई वगळता संपूर्ण कोकणात उद्या अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

दिवसभरात पावसाची संततधार तर मधूनच काही वेळेसाठी ब्रेक तर सायंकाळनंतर अचानक जोर धरत पावसाचा दिनक्रम सुरु होता. सुरवातीला सकाळी पावसाचा जोर दिसून आल्याने गौरी विसर्जनाप्रमाणेच भिजवणार की काय, असा प्रश्न मुंबईकरांना होता. सकाळी अकरानंतर पावसाचा ब्रेक दिसून आला. सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत सांताक्रूझ केंद्रात फक्त सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर पावसाला जोर चढला.

मला राष्ट्रपती व्हायचंय, काय करू?

सायंकाळी साडेपाच वाजता सांताक्रूझ येथे 21 मिमी पावसाची नोंद झाली. कमाल तापमान 29.1 अंश सेल्सिअसवर कायम असताना किमान तापमान एक अंशाने कमी नोंदवले गेले. किमान तापमान 23.6 अंश सेल्सिअस हे सरासरीच्या उणे नऊ अंशाने नोंदवले गेले.

सावधान : पुण्यातील महिलेला युट्यूब ज्योतिषाने घातला लाखाचा गंडा

दरम्यान, उर्वरित कोकणपट्ट्यात पावसाचा फारसा जोर दिसून आला नाही. सायंकाळी साडेपाचच्या नोंदीत डहाणूत केवळ तीन मिलीमीटर तर रत्नागिरीत चार मिलीमीटर पावसाची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Possibilities of Heavy Rain in Mumbai and Kokan