esakal | प्रशांत किशोर ६० वेळा येऊन भेटले तेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला - सिद्धू
sakal

बोलून बातमी शोधा

Navjot Singh Sidhu

'प्रशांत किशोर ६० वेळा येऊन भेटले तेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला'

sakal_logo
By
दीनानाथ परब

मोहाली - क्रिकेट, मनोरंजन आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणारे व्यक्तीमत्व म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू. (Navjot Singh Sidhu) सध्या राजकारणात सक्रीय असलेले सिद्धू पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंजाबमध्ये आपल्याच (punjab politics) पक्षाच्या सरकारविरोधात त्यांनी आघाडी उघडली आहे. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याबरोबर असलेले त्यांचे मतभेद सर्वश्रुत आहेत. ही मतभेदांची दरी आता आणखी रुंदावली आहे. यावेळी सिद्धू थेट आर-पारच्या लढाईच्या मूडमध्ये दिसत आहेत. सोशल मीडियावरुन ते पंजाबमधील काँग्रेस सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. सिद्धू पंजाब सरकारमध्ये मंत्रीपदावर होते. पण जुलै २०१९ मध्ये खातेबदल करण्यात आला. त्यामुळे चिडलेल्या सिद्धू यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्यांनी मीडियाशी प्रदीर्घ संवाद टाळला होता. (Prashant kishor met me 60 times after that i joined congress Navjot Singh Sidhu)

"पंजाबमधील व्यवस्था दोन शक्तीशाली कुटुंबांच्या हातात आहे. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचे नियंत्रण आहे. आमदारांना कमी लेखले जातेय. हे सर्व कशासाठी? व्यावसायिक हितासाठी. पंजाबची जनता आमदारांची निवड करते. ते अधिकाऱ्यांना निवडत नाहीत. प्रशांत किशोर मला येऊन ६० वेळा भेटले, तेव्हा मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माझ्याकडे अजेंडा कार्यक्रम आहे, हे मी त्यांना सांगितलं होतं. स्वार्थी हितांसाठी जनशक्ती ही निवडक लोकांच्या हातात असू नये. माझ्यासाठी राजकारण हे मिशन आहे, व्यवसाय नाही" असे सिद्धू म्हणाले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: मुंबईत तिसऱ्या स्तराचे निर्बंध; ग्राहकांची ठाणे, नवी मुंबईकडे धाव

मंत्रीपदाच्या राजीनाम्याच्या विषयावर सिद्धू म्हणाले की, "मंत्री म्हणून काम करताना स्वातंत्र्य नव्हते. एका माणसाकडे सर्व नियंत्रण होते. जर तुम्ही त्यांच्यासोबत असाल, तर ठिक आहे. अन्यथा ते त्यांच्या मंत्र्यांची कामे रोखून धरतात. मी अमृतसरमध्ये पाच पूल बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्यासमोर मी हा प्रस्ताव मांडला होता. सध्याच्या सत्ताधाऱ्यांसमोरही मी हा प्रस्ताव मांडला पण मला नकार मिळाला."

हेही वाचा: जुन्या मैत्रीची नवी सुरूवात? भाजप नेता पत्रावर म्हणतो...

"माझ्या आयुष्यात मी कोणाकडेही कुठलही पद मागितलेलं नाही. इतक्या वर्षात मला अनेक ऑफर आल्या. पण मी त्या नाकारल्या. मी पंजाबच्या लोकांसाठी लढतोय आणि त्यांचा माझ्यावर विश्वास आहे" असे सिद्धू म्हणाले.

शो पीस म्हणून होणारा आपला वापर मान्य नसल्याचेही सिद्धू यांनी स्पष्ट केले. "निवडणूक प्रचारात तुम्ही मला वापरणार आणि त्यानंतर शो पीस कपाटात ठेवणार. मी म्हणतो की, तुम्ही लोकांना जी आश्वासनं दिली आहेत, ती पूर्ण करा. कुठल्याही पदाशिवाय मी तुम्हाला पाठिंबा देईन. तुम्ही मला जिल्हा परिषदेवर नेमा, मला चालेल. पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणार नसाल, तर माझ्यासाठी कुठल्याही पदाचं महत्त्व नाही" असं सिद्धू यांनी सांगितलं.

loading image
go to top