काँग्रेसचा गुजरात अन् हिमाचल निवडणुकीत पराभव? प्रशांत किशोरांचं मोठं वक्तव्य

Prashant Kishor on Congress Chintan Shivir
Prashant Kishor on Congress Chintan Shivire sakal

नवी दिल्ली : काँग्रेसचं चिंतन शिबिर (Congress Chintan Shivir) नुकतंच उदयपूर येथे पार पडलं आहे. याबाबत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor on Congress Chintan Shivir) यांनी भाष्य केलं आहे. काँग्रेस या चिंतन शिबिरामधून काहीही अर्थपूर्ण साध्य करता आले नाही. येत्या काळात होणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशाच्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेस पराभव होण्याची शक्यता आहे, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.

Prashant Kishor on Congress Chintan Shivir
''काँग्रेस म्हणजे विचारसरणी गमावलेला भावाबहिणीचा पक्ष''

प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यांनी येत्या २०२४ च्या निवडणुकीसाठी काँग्रेसला एक अहवाल देखील दिला होता. पण, काही दिवसातच प्रशांत किशोर आणि काँग्रेसची चर्चा बारगळली. काँग्रेसमध्ये असे अनेक लोक आहेत, ज्यांची क्षमता माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यांनी मला ऑफर दिली. याबाबत मी त्यांचा आभारी आहे. मला एकट्याला काँग्रेसची जबाबदारी देणार, असं अनेकांना वाटत होतं. पण, समूहाने काम केलं तर विजय निश्चित असतो. त्यामुळे मला सर्वांसोबत मिळून काम करायचं होतं, असं प्रशांत किशोर म्हणाले होते. काँग्रेस हा खूप मोठा पक्ष आहे. काँग्रेसच्या घटनेनुसार काम केले जाते. त्यांच्याकडे एक संपूर्ण यंत्रणा आहे, त्यानुसार काम केले जाते. आता वेगळा गट तयार करून सर्व प्रकारची कामे करून घेतली पाहिजेत. असं केलं नाहीतर मी त्यांना फायदा करून देऊ शकणार नाही, असंही प्रशांत किशोर म्हणाले होते.

राहुल गांधींवर विश्वास नसल्याचा मुद्दा होता का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, ते म्हणाले, राहुल गांधी मोठे व्यक्ती आहेत. मी एक सामान्य माणूस आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत विश्वासाचा मुद्दा उपस्थित होऊ शकत नाही. माझी त्यांच्याशी बरोबरी नाही, असंही किशोर म्हणाले होते. दरम्यान, त्यांनी काही दिवसांपूर्वी बिहारच्या जनतेसोबत काम करणार असल्याची घोषणा देखील केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com