

Prateek Yadav Death: Pulmonary Blood Clot Caused Sudden Cardiac Collapse
esakal
समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांच्या अकस्मात निधनाचे कारण आता स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालानुसार, फुफ्फुसातील मुख्य रक्तवाहिनीत मोठ्या प्रमाणात रक्ताची गाठ (पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम) निर्माण झाल्याने त्यांचा श्वास आणि हृदयक्रिया एकाचवेळी थांबली. याला वैद्यकीय भाषेत कार्डिओरेस्पिरेटरी कोलॅप्स असे म्हटले जाते. या स्थितीत रुग्णाला वाचवण्याची कोणतीही संधी उरत नाही, इतकी ती वेगवान आणि जीवघेणी असते.