मोठी बातमी : 10 एप्रिलपासून 18 वर्षांवरील व्यक्तींना प्रिकॉशनरी डोस

आरोग्य मंत्रालयाची माहिती
 Covid 19 vaccin
Covid 19 vaccin

नवी दिल्ली : खाजगी लसीकरण केंद्रांवर आता 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोरोनाचा (Corona ) प्रिकॉशनरी डोस दिला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) देण्यात आली आहे. येत्या 10 एप्रिलपासून हे डोस उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी मोफत लसीकरण कार्यक्रम, तसेच सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार असून, त्याला आणखी गती दिली जाणार आहे, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (Precaution Doses For 18 Plus Population Group )

सध्या भारतामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, सहव्याधी असलेल्या आणि वय वर्षे 60 वरील नागरिकांना कोरोनाचा तिसरा डोस दिला जात आहे. त्याशिवाय 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लसीचा डोस दिला जात आहे. सध्या देशातील 15 वर्षे वयोगटातील सुमारे 96 टक्के लोकसंख्येला कोरोना लसीचा किमान एक डोस मिळाला आहे, तर 15 वर्षांवरील सुमारे 83 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 24 दशलक्षाहून अधिक प्रतिबंधात्मक डोस हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकसंख्येला देण्यात आले आहेत. 12 ते 14 वर्षे वयोगटातील 45% लोकांना देखील पहिला डोस मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com