
Pregnant Woman Killed
esakal
Woman Killed by Husband : गर्भवती पत्नीवर मोटार घालून अपघात भासवून खून करण्यात आल्याची घटना कागवाड तालुक्यात शिरगुप्पी-उगार रस्त्यावर घडली. याप्रकरणी संशयित पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चैताली प्रदीप किरणगी (वय २२, रा. उगार बी. के., ता. कागवाड) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. प्रदीप अण्णासाब किरणगी (रा. उगार बी. के.) असे संशयित मारेकरी पतीचे नाव आहे.