esakal | 'मातृवंदना'तून गर्भवतींना पाच हजार रुपये! कोरोनात प्रसूत महिलाही पात्र
sakal

बोलून बातमी शोधा

'मातृवंदना'तून गर्भवतींना पाच हजार रुपये! कोरोनात प्रसूत महिलाही पात्र

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून गर्भवती महिलांना पहिल्या प्रसूतीवेळी तीन टप्प्यात पाच हजारांचा लाभ मिळणार आहे.

'मातृवंदना'तून गर्भवतींना पाच हजार रुपये !

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून (Pradhan Mantri Matruvandana Yojana) गर्भवती महिलांना (Pregnant women) पहिल्या प्रसूतीवेळी तीन टप्प्यात पाच हजारांचा लाभ मिळणार आहे. शासकीय व खासगी रुग्णालयात (Hospital) प्रसूती होणाऱ्यांसाठी ही योजना लागू असल्याची माहिती डॉ. वैशाली शिरशेट्टी (Dr. Vaishali Shirshetti) यांनी दिली. कोणत्याही जात प्रवर्गातील महिलांसाठी ही योजना असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. तसेच कोरोना (Covid-19) काळात प्रसूत झालेल्या महिलांची मुले दीड-दोन वर्षांची झाली आहेत, त्यांनाही पाच हजारांचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: 'या' निवडणुकीतील विजयानंतर प्रणिती शिंदेंना मंत्रिपद?

माता व बालमृत्यू रोखण्यासाठी गरोदर व स्तनदा मातांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना ही योजना सुरू करण्यात आली आहे. शासकीय नोकरदार महिला वगळता उर्वरित सर्व गर्भवती महिलांना पहिल्या अपत्यासाठी या योजनेतून प्रत्येकी पाच हजारांचा लाभ दिला जात आहे. महिलेची गर्भधारणा झाल्यापासून 100 दिवसांत शासकीय आरोग्य संस्थेत नोंदणी केल्यानंतर एक हजार रुपयांचा पहिला हप्ता दिला जाणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यांत प्रसूतीपूर्व तपासणी केल्यानंतर दोन हजारांचा तर बाळाच्या जन्मानंतर त्याचा जन्म दाखला घेऊन 14 आठवड्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन हजारांचा लाभ दिला जाणार आहे. 2022 पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीणमधील 84 हजार 767 गर्भवती मातांना तर शहरातील 22 हजार 691 मातांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे. योजनेतून आतापर्यंत 93 हजार 478 गर्भवती मातांना या योजनेतून 39 कोटी 21 लाख 57 हजारांचा लाभ देण्यात आल्याचेही डॉ. शिरशेट्टी यांनी सांगितले. दरम्यान, शासकीय व खासगी दवाखान्यात जन्मलेल्या पहिल्या अपत्यासाठी हा लाभ दिला जाणार आहे. नैसर्गिक गर्भपात झाल्यास किंवा मृत बालक जन्मल्यानंतर त्या टप्प्यापुरता लाभ एकदाच लागू राहील. दुसरे मूल जन्मल्यानंतर पुढील टप्प्यातील लाभ मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शहर- ग्रामीणमधील शासकीय, खासगी रुग्णालयातून हा लाभ दिला जातो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा: आता कारची चोरी होणारच नाही! 'ऑर्किड'ने शोधली भन्नाट सिस्टीम

लाभासाठी "या' कागदपत्रांची गरज

  • लाभार्थी (गर्भवती) व तिच्या पतीचे आधारकार्ड

  • लाभार्थींचे आधारकार्डशी जोडलेले बॅंक खाते तथा पोस्ट खात्याच्या पासबुकची झेरॉक्‍स

  • गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 100 दिवसांत नोंदणी

  • बाळाची जन्म नोंदणीचा दाखला व प्राथमिक लसीकरणाची नोंद प्रमाणपत्र (माता बाल संरक्षक कार्ड)

loading image
go to top