

Deepak Lodhi Death: What Happened in Vrindavan?
esakal
वृंदावन येथील प्रसिद्ध आध्यात्मिक प्रवचनकार प्रेमानंद महाराज यांचे शिष्य दीपक लोधी ऊर्फ ‘रसिका दुलारी शरण’ यांच्या मृत्यूच्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास वृंदावनमधील बाराह घाट रोडवरील गुरु कृपा कुंज आश्रमाच्या इमारतीवरून खाली पडल्याने दीपक लोधी यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या प्राथमिक तपासणीत ते स्वतः छतावरून खाली पडल्याचे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र, मृत्यूमागील नेमक्या परिस्थिती बाबत अद्याप तपास सुरु आहे.