

Premanand Maharaj Disciple Suicide Case
ESakal
मथुरा : वृंदावनच्या वराहघाट येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. संत प्रेमानंद महाराज यांच्याकडून दीक्षा घेतलेल्या एका तरुण भिक्षूने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आश्रमातील चार मजली इमारतीवरून उडी मारत तरुण भिक्षूने स्वतःचा जीव संपवला. इतकेच नव्हे तर तपासणीदरम्यान तरुणाचे गुप्तांग कापले गेले असून त्याच्या खोलीत रक्ताने माखलेले एक ग्राइंडर आढळून आले आहे.