दिवसाला एक कोटी डोस देण्याची करणार तयारी - नीती आयोग

दिवसाला एक कोटी डोस देण्याची करणार तयारी  - नीती आयोग

नवी दिल्ली : नीती आयोगाचे सदस्य डॉ. वी के पॉल यांनी म्हटलंय की आपल्याला एक दिवसांत 1 कोटी डोस देण्याची तयारी करावी लागेल. काही आठवड्यांमध्येच हे शक्य होईल, आपल्याला तयारी करावी लागेल. आपण एक दिवसांत 43 लाख डोस शक्य केले आहेत. आपल्याला या उत्पादनाला पुढील 3 आठवड्यांपर्यंत 73 लाखांपर्यंत आणलं पाहिजे. आपल्याला असं करण्यासाठी एक सिस्टीम बनवावी लागेल. (preparing to give 1 crore corona vaccine doses per day says Dr VK Paul)

दिवसाला एक कोटी डोस देण्याची करणार तयारी  - नीती आयोग
मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताची मदत ठरणार कारणीभूत?

त्यांनी म्हटलंय की, राज्य आपल्या लसीच्या उत्पादन क्षमतेला जाणून आहेत. जेंव्हा त्यांनी म्हटलं की त्यांना यात लवचिकता हवीय, तेंव्हा लसीच्या खरेदीमध्ये एक नवी व्यवस्था आणली गेली. केंद्र राज्यांसाठी देशात उत्पादन केलेल्या 50 टक्के लसींना 45+ वयोगटासाठी मोफत खरेदी करेल. याशिवाय, उर्वरित 50 टक्क्यांसाठी एक विशेष चॅनेल बनवलं गेलंय ज्याठिकाणी राज्य सरकारे आणि खासगी क्षेत्र लसखरेदी आणि त्याचा पुरवठा करु शकतात.

डॉ. पॉल यांनी पुढे म्हटलंय की, पुरवठा बंद झालाय, असं म्हणणं योग्य नाहीये. वास्तव असं आहे की, उपलब्ध उत्पदनांपैकी एक वेगळा भाग राज्य सरकारसहित गैर सरकारी चॅनेलसाठी उपलब्ध आहे, ज्याचा उपयोग राज्य सरकारच्या लवचिक दृष्टीकोनानुसार आपल्या राज्यातील लोकांच्या लसीकरणासाठी केला जातो.

फायझर लसीसंदर्भात पॉल यांनी म्हटलंय की, आम्ही कंपनीच्या संपर्कात आहोत, निर्णय घेतले जात आहेत. या प्रक्रियेला आणखी गती दिली गेली आहे. त्यांच्या अडचणी सोडवल्या जात आहेत. त्यांना औपचारिकरित्या मागणी करावी लागेल. लवकरच त्यावर समाधानकारक उत्तर शोधलं जाईल.

दिवसाला एक कोटी डोस देण्याची करणार तयारी  - नीती आयोग
ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

लहान मुलांच्या लसीबाबत दिलं स्पष्टीकरण

लहान मुलांच्या लसीबाब त्यांनी म्हटलंय की, कोव्हॅक्सिनला मान्यता मिळाली आहे, ते लहान मुलांवरील चाचण्या सुरु करतील. मला असं सांगितलं गेलंय की सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया नोवावॅक्सचे लहान मुलांवरील चाचण्या सुरु करु इच्छित आहे. जेंव्हा केंव्हा नव्या लसीचा शोध लावला जातो, तेंव्हा सामान्यत: सर्वांत आधी वयस्कर लोकांवर त्याचा प्रयोग केला जातो. लहान मुलांना धोक्यात टाकलं जात नाही. मात्र आता फायझर लस लहान मुलांवर दिली जाऊ शकते, असं समजलंय. काही देश आता असं करणं सुरु करणार आहेत. WHO ने यासंदर्भात काही सल्ला दिला नाहीयेत कारण लहान मुलांमध्ये अद्याप फार संक्रमण दिसून येत नाहीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com