

President ADC Rules Selection Process And Eligibility Know Why Only One Officer Is Selected
Esakal
वयाच्या ३०व्या वर्षी मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी राष्ट्रपतींच्या एडीसी सारख्या प्रतिष्ठीत पदाचा राजीनामा दिला आहे. इतक्या कमी वयात राजीनामा दिल्यानं मेजर ऋषभ चर्चेत आले आहेत. आता त्यांनी एका पॉडकास्टमध्ये एडीसी पोस्टबाबत आणि त्यांची पात्रता, निवड प्रक्रिया याची माहिती दिलीय. एडीसी म्हणजे एड डी कँप टू द प्रेसिडंट ऑफ इंडिया. राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी एडीसीवर असते. त्यांची सावली बनून सतत सोबत रहावं लागतं.