माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राज्यसभेवर नियुक्ती!

वृत्तसंस्था
मंगळवार, 17 मार्च 2020

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांच्या नावाची शिफारस केली. १२ सदस्यांची राज्यसभेवर निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.

नवी दिल्ली : राज्यसभेसाठी माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून शिफारस केंद्र सरकारने सोमवारी (ता.१६) केली. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

राज्यसभेवर १२ सदस्यांची निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. केटीएस तुलसी यांचा कार्यकाळ संपल्याने त्या जागेसाठी गोगोई यांची शिफारस करण्यात आली आहे.

- Coronavirus : भारत लॉकडाऊनमध्ये जाईल? जाणून घ्या सत्य!

गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी भारताचे ४६ वे सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली होती. त्यांचा कार्यकाळ सुमारे १३ महिन्यांचा होता. यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण खटले गोगोई यांच्या खंडपीठाने निकालात काढले.

- कोरोनामुळे 'देऊळ बंद'; पुणे जिल्ह्यातील देवस्थान समित्यांचा निर्णय

अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेचा वाद, तसेच शबरीमला मंदिरात महिलांचा प्रवेश, राफेल लढाऊ विमानांची खरेदी यांसारख्या महत्त्वाच्या खटल्यांचा निकाल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दिला होता.

- 'असा' असेल होम क्वारंटाईनचा शिक्का, पाहा फोटो...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोई यांच्या नावाची शिफारस केली. १२ सदस्यांची राज्यसभेवर निवड करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. केटीएस तुलसी यांचा कार्यकाळ संपल्याने रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रपती नामनिर्देशीत खासदार म्हणून गोगोई यांची आता निवड झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: President Ram Nath Kovind nominates former CJ Ranjan Gogoi to the Rajya Sabha