esakal | IAF बेसवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी आर्मीचा रोल, वापरली 'ही' टेक्निक
sakal

बोलून बातमी शोधा

iaf

IAF बेसवरील हल्ल्यामागे पाकिस्तानी आर्मीचा रोल, वापरली 'ही' टेक्निक

sakal_logo
By
दीनानाथ परब

श्रीनगर: जम्मूमधील इंडियन एअर फोर्सच्या बेसवर (IAF base attack) झालेल्या हल्ल्यामध्ये 'प्रेशर फ्यूज' टेक्निकचा वापर करण्यात आल्याचं तपासातून समोर आलय. लष्कर-ए-तोयबाने (Lashkar-e-Toiba) घडवून आणलेल्या या ड्रोन हल्ल्यामध्ये (drone attack) त्यांना पाकिस्तानी लष्कर किंवा ISI ने मदत केल्याचे संकेत मिळत आहेत. तपास यंत्रणेतील सूत्रांनी ही माहिती दिली. IED स्फोटकांमुळे आयएएफच्या बेसवरील एका इमारतीच्या छताचे नुकसान झाले. (Pressure fuse used in J&K drone attack hints at Pak military role Probe team)

१ किलोपेक्षा कमी RDX आणि मिक्स केलेले केमिक्लस होते. दुसरा स्फोट मोकळ्या जागेत झाला. त्या स्फोटकांचे वजन १ किलोपेक्षा जास्त होते. २७ जूनला झालेल्या हल्ल्यात निश्चित पाकिस्तानी लष्कराच्या टेक्निकल ज्ञानाचा वापर करण्यात आला. पाकिस्तानी लष्कराने एकदा 'प्रेशर फ्यूज' टेक्निकचा वापर केला होता.

हेही वाचा: मुंबईकरांच्या लसीकरणासंदर्भात एक चांगली बातमी

स्फोटक उपकरण वेगाने जमिनीवर आदळल्यानंतर सक्रिय होते किंवा एखादी व्यक्ती, गाडी त्यावरुन गेल्यानंतर स्फोट होतो. मॉर्टर बॉम्ब, आर्टिलरी शेल्समध्ये असे फ्युज असतात.

हेही वाचा: सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करा, अन्यथा...भाजपाने दिला इशारा

पाकिस्तानने (pakistan) त्यांच्या देशात पिझ्झा (pizza delivery) आणि औषधांची डिलिव्हरी करण्यासाठी चीनकडून (china) मोठ्या प्रमाणावर ड्रोन्स विकत घेतले आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांना गुप्तचरांकडून ही माहिती मिळाली आहे. . ड्रोन हल्ल्याच्या प्राथमिक तपासात यामध्ये पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेचा हात दिसत आहे, असे जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले. जम्मूमधील या एअर फोर्स स्टेशनपासून भारत-पाकिस्तान सीमा १४ किमी अंतरावर आहे. यापूर्वी ड्रोन्सचा वापर करुन भारताच्या हद्दीत १२ किमी आतापर्यंत शस्त्रास्त्र टाकण्यात आली होती.

loading image