पंतप्रधानांची ‘मन की बात’मधून तरुणाईला साद

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 30 डिसेंबर 2019

मोदी म्हणाले...

 • महात्मा गांधीजींनी आत्मनिर्भर होण्यासाठी भारतीयांना एकजुटीचाच रस्ता दाखविला होता- कन्याकुमारीचे विवेकानंद स्मारक जगासाठी राष्ट्रभक्तीचे तीर्थक्षेत्र बनले आहे. 
 • बिहारच्या पश्‍चिम चंपारण्यातील भैरवगंज आरोग्य केंद्राची निर्मिती एका स्थानिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केली आहे.
 • १९८५ च्या माजी विद्यार्थ्यांनी एका मेळाव्यात या केंद्राची मुहूर्तमेढ रोवली.
 • उत्तर प्रदेशातील फुलपूरच्या महिलांनी बनविलेली पादत्राणे देशविदेशात कौतुकाचा विषय ठरली आहेत.
 • एकजुटीने काम केले तर काय होऊ शकते, हे सांगणारी या महिलांची कहाणी प्रत्येकाला प्रेरणादायी आहे.
 • महात्मा गांधींनी स्वदेशीची भावना एका दिव्याच्या स्वरूपात मांडली होती. असे दिवे लाखो लोकांच्या जीवनाला प्रकाशमान करतात.
 • प्रत्येक भारतीयाने स्थानिक वस्तूच खरेदी कराव्यात, असे आवाहन मी लाल किल्ल्यावरून १५ ऑगस्टला केले होते. आपण त्यादृष्टीने काही करतो आहोत का, हे प्रत्येकाने पुन्हा पाहावे.  
 • २०२२ मध्ये जेव्हा स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील तोपर्यंतच्या २-३ वर्षांत आम्ही, याच देशात बनलेल्या जास्तीत जास्त वस्तू घेण्याचा आग्रह प्रत्यक्षात का आणू नये.
 • नुकतेच झालेले सूर्यग्रहण पाहण्यासाठी मीही उत्सुक होतो. दिल्लीच्या आकाशात ढग असल्याने मी तो आनंद घेऊ शकलो नाही. पण दूरचित्रवाणीवर ग्रहणाची सुंदर छायाचित्रे मी पाहिली व खगोलतज्ज्ञांशी याबाबत काही चर्चाही केली.
 • आर्य भट्ट व त्यांचे शिष्य भास्कर यांच्यापासून भारताला खगोलशास्त्राचा प्राचीन, गौरवशाली इतिहास आहे. 
 • आपल्याकडे ठिकठिकाणी जंतरमंतर आहेत त्यांचा खगोल विज्ञानाशी घनिष्ठ संबंध असतो.

नवी दिल्ली - देशातील युवक हा अराजकतेचा तिरस्कार करतो, अशी ‘मन की बात’ मांडत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नागरिकत्व कायद्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या संतप्त तरुणाईला चुचकारण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, सूर्यग्रहणाची चर्चा करताना मोदींनी पुण्यातील; तसेच लडाख व नैनितालमधील विशाल दुर्बिणींचा (टेलिस्कोप) उल्लेख केला. सरत्या वर्षाच्या अखेरच्या आकाशवाणी संवादात मोदींनी येणाऱ्या दशकात आधुनिक भारताच्या निर्मितीत, विकासाला गती देण्यात २१व्या शतकात जन्मलेले युवक सर्वांत मोठी भूमिका बजावतील, असे सांगितले. आमच्या देशातील युवकाला जातीवाद, घराणेशाही, स्त्री-पुरुष, ‘आमचे व त्यांचे’ यासारख्या दुर्व्यवस्था अजिबात पसंत नाहीत, असे ते म्हणाले. अस्थिरता, अव्यवस्था व अराजकतेबद्दल आजच्या तरुणाला तिरस्कार आहे, असे सांगताना त्यांनी, काळ्या कायद्याच्या विरोधातील आदोलनांत तुरळक ठिकाणी झालेल्या जाळपोळीकडे अंगुलीनिर्देश केला.

ट्रॅफिक पोलिसांनी फाडली प्रियंका गांधींचीच पावती; पाहा काय घडलं?

संसदेच्या मागील अधिवेशनात लोकसभेने ११४ टक्के; तर राज्यसभेने ९४ टक्के कामकाज केल्याचे मोदी यांनी सांगितले. (राज्यसभा सभापतींनी हाच आकडा ९९ ते १०० टक्के सांगितला होता.) ते म्हणाले, ‘‘जम्मू-काश्‍मीरमध्ये ‘हिमायत’ या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून १८ हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २१व्या शतकातील युवकांना मिलेनियल, जेन झेड किंवा जनरेशन झेड अशा नावांनी ओळखले जाते. ही पिढी अत्यंत प्रभावशाली असून, त्यांना स्वतःचा विचार आहे. ते सदैव काही वेगळे करण्याचे स्वप्न बाळगतात.

अमृता फडणवीस यांना शिवसेनेचं प्रत्युत्तर; पाहा कोणी दिले उत्तर! 

विमानतळांवर किंवा सिनेमाघरांमध्ये रांग तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर युवकच सर्वांत प्रथम त्याला विरोध करतात. हा भारतीय युवक व्यवस्था मानतो; पण व्यवस्था जर योग्य पद्धतीने प्रतिसाद देत नसेल तर अस्वस्थ होऊन व्यवस्थेलाच सवाल करण्याची हिंमत तो बाळगतो. म्हणूनच स्वामी विवेकानंदांना हा विश्‍वास होता, की या युवकांमधूनच माझे कार्यकर्ते निर्माण होतील.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From the Prime Minister Man Ki Baat to the young man