esakal | 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी केला महाराष्ट्रातील 'रॉकी'चा खास उल्लेख  
sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi, Man Ki Baat, Pm Modi

कोरोनामुळे आज देशात सर्वच क्षेत्रात बिकट परिस्थिती आहे. पंतप्रधान मोदींनी या भाषणात भारत इथून पुढे पर्यावरणपूरक खेळणी बनवणार असून भारतीय जनतेने स्वदेशी खेळणी खरेदी  करण्यावर भर दिला पाहिजे असं आवाहनही केलं.

'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींनी केला महाराष्ट्रातील 'रॉकी'चा खास उल्लेख  

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

महाराष्ट्रातील बीडच्या पोलिस दलातील 'रॉकी' बरोबरच सैन्यदलातील 'लिसा' आणि 'विदा' या श्वानांचं कार्य उल्लेखनीय आहे. आपण इथून पुढे लष्करात आणि पोलिस दलात भारतीय प्रजातींचा श्वानांचा सामावेश केला पाहिजे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' या कार्यक्रमामध्ये मांडलं. हा 'मन की बात' या कार्यक्रमाचा 68 वा भाग होता. कोरोना सारख्या महामारीचा सामना करत असताना आपण सर्वांनी आत्मनिर्भर झालं पाहिजे,  सध्या आत्मनिर्भर भारतासाठी सर्वांचं दायित्व महत्वाचं आहे, हा मुद्दाही पंतप्रधान मोदींच्या भाषणात आला. तसेच त्यांनी देशातील जनतेच्या संयमाचंही कौतूक केलं.

'अबतक' 68 भाग... 'मन की बात' कार्यक्रमातील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

कोरोनामुळे आज देशात सर्वच क्षेत्रात बिकट परिस्थिती आहे. पंतप्रधान मोदींनी या भाषणात भारत इथून पुढे पर्यावरणपूरक खेळणी बनवणार असून भारतीय जनतेने स्वदेशी खेळणी खरेदी  करण्यावर भर दिला पाहिजे असं आवाहनही केलं. भारतात लहान मुलांच्या खेळण्यांची 7 लाख कोटींची बाजारपेठ असून तिथं भारताचा वाटा अजून वाढणार असल्याचेही संकेत पंतप्रधान मोदींनी दिले. 2016 मध्ये भारतात मोदी सरकारने 'स्टार्ट-अप इंडिया' (STARTUP INDIA) योजना सुरू केली होती. सध्या या योजनेचा मोठा फायदा होत असून ग्रामीण भारतातील अनेक तरुण नवनवीन ऍप बनवत आहेत. तसेच 'ऍप इनोव्हेशन चॅलेंज'ला उत्कृष्ट प्रतिसादही मिळत आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली,

होयबांची सरशी (श्रीराम पवार)

सध्या भारतात टिक-टॉकच्या (Tiktok) वापरावर बंदी घातली आहे. भारतातील ओडीशाच्या सिध्दार्थ गौतम या तरुणाने tik tok ला पर्याय म्हणून तयार केलेल्या 'चिंगारी ऍप'चा देखील उल्लेख मोदींनी 'मन की बात'मध्ये केली. तसेच भारतातील आजच्या मोठ्या ज्या कंपन्या मोठ्या होत आहेत त्यांना स्टार्ट-अप इंडिया या योजनेचा फायदा झाल्याचे मोदींनी सांगितले. पुढे बोलताना मोदींनी नवीन शिक्षण धोरणाचे महत्व सांगत नव्या शिक्षण धोरणात खेळाला अधिक उच्च स्थान असल्याचेही सांगितले. आपण सर्वानी शरीराला जेवढी गरज आहे तेवढाच आहार घेतला पाहिजे आणि तंदूरुस्त राहिले पाहिजे, असंही मोदींनी मन की बातमध्ये सांगितलं.