पंतप्रधान मोदींचा केसीआर यांच्यावर हल्ला; कुटुंबवादावरून म्हणाले...

Prime Minister Modi's attack on KCR
Prime Minister Modi's attack on KCRPrime Minister Modi's attack on KCR

कुटुंबवादामुळे (Familyism) देशातील तरुण आणि कलागुणांना देशाच्या राजकारणात येण्याची संधीही मिळत नाही. कुटुंबवाद प्रत्येक स्वप्नाचा चुराडा करतो. तो त्यांच्यासाठी प्रत्येक दरवाजा बंद करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. पंतप्रधान गुरुवारी (ता. २६) तेलंगणा दौऱ्यावर आहे. हैदराबादमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी कुटुंबवादावर जोरदार निशाणा साधला. तसेच भाजपला विजयाचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले. (Prime Minister Modi's attack on KCR)

२१ व्या शतकातील भारतासाठी कुटुंबवादापासून मुक्तता, कौटुंबिक पक्षांपासून स्वातंत्र्य हा संकल्प आणि नैतिक चळवळ आहे. परिवार पक्ष फक्त स्वतःचा विकास करतात. कुटुंबातील सदस्यांची तिजोरी भरतो. या पितृसत्ताक पक्षांना गरिबांच्या वेदनांची चिंता नाही. एखाद्या कुटुंबाने कोणत्याही मार्गाने सतत सत्ता काबीज करून लुबाडणूक केली तर लुबाडणूक चालूच ठेवावी, यावरच त्यांचे राजकारण केंद्रित आहे, असेही नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

Prime Minister Modi's attack on KCR
मनसेकडून पवारांचा बृजभूषणसोबतचा दुसरा फोटो ट्विट; काय म्हणाले देशपांडे?

भाजप (BJP) कार्यकर्त्यांना सांगेन की, आम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. तेलंगणातील (Telangana) जनतेच्या सेवेत आपण कोणतीही कसर सोडू नये. मला पूर्ण विश्वास आहे की भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता यापुढेही त्याच उत्साहाने आणि समर्पित भावनेने काम करीत राहील, असेही पंतप्रधान म्हणाले.

तेलंगणातून योगींचे अभिनंदन

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचेही तेलंगणाच्या या भूमीतून अभिनंदन करतो. त्यांना कोणीतरी सांगितले की अशा ठिकाणी जाऊ नका, पण योगीजी म्हणाले की, माझा विज्ञानावर विश्वास आहे आणि ते निघून गेले. आज ते पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com