esakal | PM मोदी करणार आज 'मन की बात'; 'या' विषयांवर बोलण्याची आहे शक्यता

बोलून बातमी शोधा

mann ki baat}

त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन असेल.

PM मोदी करणार आज 'मन की बात'; 'या' विषयांवर बोलण्याची आहे शक्यता
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या 'मन की बात' या रेडीओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संवाद साधतील. त्यांचं हे आजवरचं 74 वं संबोधन असेल. या मनोगतात ते कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तसेच लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याबाबत देशवासीयांशी संवाद साधण्याची शक्यता आहे. 

याआधी गेल्या 73 व्या 'मन की बात'मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने काढलेल्या ट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेचा ओझरता उल्लेख करत या विषयावर देशाचं लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की 26 जानवारी रोजी झालेल्या तिरंग्याच्या अपमानामुळे देश दुखी झाला आहे. 

हेही वाचा - आसाममध्ये भाजपला मोठा झटका; प्रमुख सहकारी 'बोडोलँड पीपल्स फ्रंट'ने सोडली साथ

मोदींनी मागच्या मन की बातमध्ये कोरोना महासाथीबाबत चर्चा केली होती. त्यांनी म्हटलं होतं की या वर्षाच्या सुरवातीसह कोरोनाच्या लढाईला देखील आता जवळजवळ एक वर्ष पूर्ण झालं आहे. भारताची कोरोना विरोधातील लढाई जगासमोर एक आदर्श बनून उभी राहिली आहे अगदी तसेच आता कोरोना लसीकरणाच्या मोहिमेने देखील जगाला भूरळ पाडली असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. आजच्या मन की बातमध्ये ते कोरोना व्यतिरिक्त आणखी कोणत्या बाबतीत संवाद साधतील, याकडे देशाचं लक्ष आहे. आज सकाळी 11 वाजता त्यांचं हे संबोधन देशासमोर सादर होईल.