esakal | PM मोदी आणि भुतानचे PM शेरिंग यांच्याहस्ते दुसऱ्या टप्प्यातील रुपे कार्डचा शुभारंभ
sakal

बोलून बातमी शोधा

indo bhutan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भुतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्यासोबत दुसऱ्या टप्प्यातील रुपे कार्डचा शुभारंभ केला.

PM मोदी आणि भुतानचे PM शेरिंग यांच्याहस्ते दुसऱ्या टप्प्यातील रुपे कार्डचा शुभारंभ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भुतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांच्यासोबत दुसऱ्या टप्प्यातील रुपे कार्डचा शुभारंभ केला. याद्वारे भुतानचे नागरिक भारतामध्ये रुपे नेटवर्कचा फायदा घेऊ शकतील. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोटे शेरिंग यांनी एका व्हिडीओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून या कार्डचा शुभारंभ केला. 

2019 मध्ये पहिल्या टप्प्यातील कार्डचा शुभारंभ
याआधी 2019 मध्ये नरेंद्र मोदी यांनी भुतान दौऱ्यामध्ये पहिल्या टप्प्यातील रुपे कार्डचे उद्घाटन केले होते. पहिल्या टप्प्याअंतर्गत भारताचे नागरिक भुतानमधील एटीम आणि पाँईट ऑफ सेल मशीन वर देवघेव करण्यासाठी सक्षम झाले होते. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटलं की पहिल्या टप्प्यात भारताचे नागरिक संपूर्ण भुतानमध्ये रुपे कार्डचा वापर एटीएम नेटवर्कसाठी करु शकत होते. तर दुसऱ्या टप्प्यात भुतानी नागरिक भारतात रुपे कार्डचा वापर करु शकतील. 

हेही वाचा - कधी संपणार ही मानसिकता? दलितांचे केस कापले म्हणून ठोठावला 50 हजारांचा दंड

महामारीशी यशस्वीपणे लढेल भारत - शेरिंग
या कार्यक्रमादरम्यान भुतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी महामारीशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. त्यांनी म्हटलं की, मला विश्वास आहे की, भारत या महामारीशी यशस्वीपणे लढा देईल. भारत लस विकसित करण्यात आघाडीवर आहे. आणि हा आमच्या सर्वांसाठी आशेचा किरण आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, भुतानसाठी लस उपलब्ध करण्याच्या आश्वासनासाठी आम्ही आपले आणि आपल्या सरकारचे आभारी आहोत. 

हेही वाचा - VIDEO : हत्तीण पडली मोठ्या विहरीत; 16 तासांच्या अथक प्रयत्नानंतर काढलं बाहेर

भुतानच्या उपग्रहासाठी मोदींनी दिल्या सदिच्छा

पुढच्या वर्षी इस्रोच्या मदतीने भूतानचे उपग्रह अवकाशात पाठवण्याचे काम वेगाने सुरू आहे याचा मला आनंद आहे. या उद्देशाने भूटानचे चार स्पेस इंजिनिअर्स डिसेंबरमध्ये इस्रोला जातील, मी या चारही तरुणांना माझ्या सदिच्छा देतो, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय.