esakal | कधी संपणार ही मानसिकता? दलितांचे केस कापले म्हणून ठोठावला 50 हजारांचा दंड
sakal

बोलून बातमी शोधा

boycotted

भारतीय समाजात आजही जातीभेद पहायला मिळतो.

कधी संपणार ही मानसिकता? दलितांचे केस कापले म्हणून ठोठावला 50 हजारांचा दंड

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बेंगलोर : भारतीय समाजात आजही जातीभेद पहायला मिळतो. भारतीय संविधानाने कायद्यान्वये अस्पृश्यता हा प्रकार बंद केला असला तरीही आजही तो अनेक ठिकाणी सर्रास पहायला मिळतो. फक्त त्याचे मार्ग बदलले आहेत. अशीच एक घटना कर्नाटकातील म्हैसूर जिल्ह्यातून समोर आली आहे. दलित जातीच्या लोकांचे केस कापण्याचे काम केले म्हणून न्हाव्याला 50,000 रुपयांचा दंड गावांतील काही नेत्यांनी ठोठावला आहे. या साऱ्या छळामुळे त्रस्त झालेल्या पीडित न्हाव्याने आता आत्महत्येचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा - Corona Virus : अहमदाबादमध्ये तीन दिवसांचा कर्फ्यू; शाळा सुरु करण्याचाही निर्णय देखील रद्द

ही घटना आहे म्हैसूर जिल्ह्यातील ननजानगुडी तालुक्यातील. पीडित मलिक्कार्जून शेट्टी हे स्वत:चे सलून चालवतात. त्यांनी आपल्या सलूनमध्ये अनुसुचित जाती-जमातींच्या लोकांचे केस कापले म्हणून गावातील काही जातीयवादी बड्या नेत्यांनी त्यांना त्रास दिला आहे. त्यांना गावातून बहिष्कृत  केलं आहे. तसेच त्यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय, हा दंड त्यांना पहिल्यांदाच नाही तर याआधीदेखील झाला आहे. त्यांनी तो नाईलाजाने भरला देखली होता. गावातील चन्ना नाईक आणि इतर लोक त्यांना त्रास देत असल्याचं त्यांनी सांगितलंय. तसेच हे प्रकरण जर थांबलं नाही तर आत्महत्या करण्याचाही इशारा दिला आहे. 

हेही वाचा - Corona : कधी येईल लस आणि काय असेल किंमत; 'सीरम'चे आदर पूनावाल यांनी दिली माहिती

याबाबत आपली व्यथा मांडताना पीडित मल्लिकार्जून शेट्टी यांनी म्हटलं की, हे माझ्यासोबत तिसऱ्यांदा घडतंय. मी याआधीही याच कारणास्तव दंड भरला आहे. अनुसुचित जाती-जमातींच्या लोकांचे केस कापले म्हणून चन्ना नाईक आणि काही इतर लोक मला मानसिक त्रास देत आहेत. जर हा त्रास थांबला नाही तर मी माझ्या कुंटुंबासोबत आत्महत्या करेन. मी याबाबत अधिकृतरित्या तक्रारही दाखल केली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. 

loading image