काही घटनांमुळे दोन्ही देशांचे संबंध...; अमेरिकेच्या गंभीर आरोपावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

खलिस्तानी अतिरेकी गुरपतवत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट एका भारतीयाने रचल्याचा गंभीर आरोप अमेरिकी सरकारने केला होता. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Prime Minister Narendra Modi first response to US allegations of a plot to kill Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun
Prime Minister Narendra Modi first response to US allegations of a plot to kill Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun

नवी दिल्ली- खलिस्तानी अतिरेकी गुरपतवत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट एका भारतीयाने रचल्याचा गंभीर आरोप अमेरिकी सरकारने केला होता. यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अशा काही घटनांमुळे भारत आणि अमेरिकेतील संबंध बिघडणार नाहीत, असं मोदी म्हणाले आहेत.(Prime Minister Narendra Modi gave his first response to US's allegations of a plot to kill Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun)

अमेरिकेने काही गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोपांना बळ देणारे काही पुरावे आहेत का याचा आम्ही शोध घेऊ. या प्रकरणात भारत लक्ष घालेल, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. अमेरिकेतील वृत्तसंस्था फायनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच याबाबत उघडपणे वक्तव्य केलंय.

Prime Minister Narendra Modi first response to US allegations of a plot to kill Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun
पन्नू हत्येचा कट रचल्याप्रकरणी अमेरिकेच्या कारवाईवर भारताचं मोठं वक्तव्य! म्हटलं, हे कृत्य म्हणजे...

५२ वर्षीय निखिल गुप्ता यांच्याविरोधात २९ नोव्हेंबर रोजी अमेरिकेने आरोपपत्र दाखल केले होते. यात असा दावा करण्यात आला होता की, निखिल गुप्ता आणि एका भारतीय सरकारी अधिकाऱ्याने अमेरिकी नागरिक गुरपतवत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचला. या आरोपानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे भारत-अमेरिका संबंधात काहीशी कटूता निर्माण होण्याची शक्यता होती.

Prime Minister Narendra Modi first response to US allegations of a plot to kill Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannun
Sakal Podcast : अमेरिका आणि चीनमधील संबंध 'पांडा' सुधारणार ते मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी नेमकं कोण? राज ठाकरेंचा प्रश्न

पंतप्रधान मोदी मुखालतीत म्हणाले की, काही देशात भारत विरोधी कट्टर संघटना कार्यरत आहेत. अनेकवेळा त्यांच्याकडून प्रक्षोभक वक्तव्य येत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर हे सुरु आहे. सुरक्षा आणि दहशतवादाला विरोध हे मुद्दे भारत आणि अमेरिका संबंधात महत्त्वाची भूमिका बजावतात.

काही घटनांना भारत आणि अमेरिकेच्या राजनैतिक संबंधांशी जोडणे योग्य ठरणार नाही. दोन्ही देशांकडून संबंध अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. हे एका स्थिर संबंधाचं निदर्शक आहे, असं मोदी म्हणाले. दरम्यान, निखिल गुप्ता यांना झेक रिपब्लिक येथे अटक करण्यात आलं असून ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com