मोठी बातमी! PM मोदी करणार पुतीन यांना फोन; भारत मध्यस्थ होणार?

PM Narendra Modi
PM Narendra Modisakal

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine Conflict) आज हल्ला केला आहे. त्यानंतर आता युक्रेनमधील परिस्थिती चिघळली असून युक्रेनच्या भारतातील राजदुतांनी भारताकडे मध्यस्थीची अपेक्षा व्यक्त केली आहे. राजदूत डॉ. इगोर पोलिखा (Dr Igor Polikha) यांनी भारत सरकारकडे रशिया-युक्रेन वादाच्या पार्श्वभूमीवर हस्तक्षेप करत युद्ध थांबवण्याविषयीची भूमिका घेण्याची विनंती केली आहे.

पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत चर्चा करावी आणि त्यांना हे युद्ध थांबवण्यास सांगाव, असं कळकळीचं आवाहन केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवर बोलणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com