
Prime Minister Narendra Modi Speech
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधन केले आहे. नवरात्रीच्या एक दिवस आधी येणारे हे संबोधन खूप खास मानले जात आहे. कारण उद्या नवीन GST लागू होत आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील व्यापारी विविध करांच्या जाळ्यात अडकले होते. प्रवेश कर, विक्री कर, उत्पादन शुल्क, सेवा कर, व्हॅट... आपल्या व्यावसायिकांवर डझनभर कर आकारले जात होते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू पाठवण्यासाठी आपल्याला असंख्य फॉर्म भरावे लागत होते. अनेक अडथळे होते.