Narendra Modi : ‘एनडीए’ खासदारांशी पंतप्रधान संवाद साधणार

२०२४ च्या लोकसभा निवडणूक भाजपने ५१ टक्के मते आणि साडेतीनशेच्या आसपास जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे.
Narendra Modi
Narendra ModiSakal

नवी दिल्ली - २०२४ च्या लोकसभा निवडणूक भाजपने ५१ टक्के मते आणि साडेतीनशेच्या आसपास जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी ‘एनडीए’च्या सर्व खासदारांशी राज्यनिहाय संवाद साधणार आहे.

याअंतर्गत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात मधील एनडीएच्या खासदारांना भेटणार आहेत. दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात तीन ऑगस्टला ही बैठक होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने ५१ टक्के मते मिळविण्याचे आणि ३४० ते ३५० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आखले आहे. तर महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ आणि विधानसभेमध्ये २०० हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट आहे.

त्यासाठी भाजपने सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये लोकसभा प्रमुख आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा प्रमुखांची नियुक्ती केल्याचे समजते. या लोकसभा प्रमुख आणि विधानसभा प्रमुखांना निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून तयारी करण्यास सांगण्यात आले आहे.

लोकसभा आणि विधानसभेचे जे मतदारसंघ एनडीएतील मित्रपक्षांना सोडण्यात येतील त्या ठिकाणी हे लोकसभा आणि विधानसभा प्रमुख मित्रपक्षांचे काम करतील. दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस मिळून १२० जागा सोडल्या जाऊ शकतात. तर उर्वरित सर्व जागा भाजप लढेल, असेही समजते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून नुकत्याच झालेल्या ‘एनडीए’तील घटक पक्षांच्या बैठकीनंतर आता एनडीएच्या सर्व खासदारांशी देखील पंतप्रधान मोदी चर्चा करणार असून तयारीचा आढावा घेतील. यासाठी खासदारांचे राज्यनिहाय दहा समूह तयार करण्यात येणार असून एकेका समुहात ३५ ते ४० खासदारांचा समावेश असेल. या समुहांशी पंतप्रधान मोदी बातचित करतील.

२५ जुलैपासून बैठका

२५ जुलैपासून या बैठकांना सुरवात होणार आहे. त्याअंतर्गत उत्तरप्रदेश तसेच ईशान्य भारतातील खासदारांसमवेत पहिली बैठक होईल. तर महाराष्ट्रातील एनडीएच्या खासदारांसोबत पंतप्रधान मोदींची बैठक तीन ऑगस्टला होण्याची चिन्हे आहेत.

दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावर असलेल्या नवीन महाराष्ट्र सदनात ही बैठक होईल. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गट आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अजित पवार गट भाजपसोबतच असून नुकत्याच झालेल्या एनडीएच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती.

त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या खासदारांचाही या बैठकीत समावेश असेल. शिवाय, महाराष्ट्रासोबतच गुजरात आणि गोव्यातील भाजप खासदारही यामध्ये सहभागी होतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com