पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 डिसेंबर 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सोनिया गांधी यांना व्टिट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

दिल्ली : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया यांचा आज वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सोनिया गांधी यांना व्टिट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

दरम्यान, सोनिया गांधी यांनी यंदाच्या वर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेण्यामागचं कारण म्हणजे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातील विविध भागात महिलांवर अत्याचार, बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे आपल्याला दु:ख होत आहे आणि त्यामुळेच त्यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी सोनिया गांधी यांना व्टिट करत शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'मौनाचे प्रयोग'

सोनिया गांधी यांचा जन्म ९ डिसेंबर १९४६ मध्ये झाला होता. सोमवार (९ डिसेंबर) रोजी सोनिया गांधी या ७३ वर्षांच्या होतील. अलिकडच्या काळात महिलांवरील अत्याचारांच्या घटना बरीच वाढ झाली आहे. तसेच महिलांविरुद्ध अशा काही घटना गेल्याकाही दिवसंत घडल्या आहेत ज्यामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महिलांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांमुळे संपूर्ण देशातील नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

दरम्यान, तेलंगणामधील एका महिला डॉक्टरसोबत चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्यांतर आरोपींनी तिला जाळले. २७ नोव्हेंबरच्या रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण देश हादरला. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत चारही आरोपींना अटक केली. त्यानंतर शुक्रवारी क्राईम सीन रिक्रिएशनसाठी पोलिसांनी या आरोपींना घटनास्थळी नेलं असता आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आरोपींना आत्मसमर्पण करण्यास सांगितले मात्र, आरोपींनी पोलिसांवर दगडफेक आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात चारही आरोपींचा मृत्यू झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 'मौनाचे प्रयोग'

दरम्यान, 2014 रोजी जम्मू काश्‍मीरमधील दहशतवादी हल्ला आणि छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्याच्या वेळी वाढदिवसाचे कार्यक्रम रद्द केले होते. त्या वेळी त्यांनी पक्षकार्यकर्त्यांना वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना दिल्या होत्या, असे पक्ष सूत्राने सांगितले. 2013 रोजी दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या निधनामुळेही सोनिया गांधी यांनी वाढदिवस साजरा केला नव्हता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi wishes Sonia Gandhi