
सरकारी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षिकेवर शिक्षक आणि मुख्याध्यापक या दोघांचाही जीव जडला. मात्र प्रेमाच्या या त्रिकोणात एकाची हत्या करण्यात आली. रामाश्रय यादव असं हत्या केलेल्या शिक्षकाचं नाव असून बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात ही घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे तब्बल ५५ दिवसांनी या हत्याकांडाचा उलगडा झालाय. पोलिसांनी या प्रकरणी मुख्याध्यापकासह ७ जणांना अटक केली असून यात तीन शूटर्सचा समावेश आहे.