मुख्याध्यापकाचं धक्कादायक कृत्य, महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच केली चपलेने मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

viral video

मुख्याध्यापकाचं धक्कादायक कृत्य, महिला शिक्षिकेला विद्यार्थ्यांसमोरच केली चपलेने मारहाण

विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या एका शाळेतून एक धक्कादायक कृत्य समोर आलंय. मुलांसमोरच मुख्याध्यापकांनी महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लखीमपूरच्या महांगुखेडा प्राथमिक शाळेतील ही घटना घडली. (principal beat female teacher with slippers in school video goes viral)

हेही वाचा: CBSE चा नवा अभ्यासक्रम लागू, इस्लामचा उदय अन् मुघल साम्राज्याचा इतिहास वगळला

या व्हिडिओत शाळेचे मुख्याध्यापक शिक्षिकेला चपलेने मारहाण करताना दिसत आहे. एवढंच काय तर याला प्रतिउत्तर म्हणून शिक्षिकाही मुख्याध्यापकाला मारहाण करताना दिसत आहे.या मारहाणीमागील कारण ऐकाल तर तुम्ही थक्क व्हाल.

शिक्षिका एक दिवसापूर्वी गैरहजर होते, असे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या दिवशी या शिक्षिकेने रजिस्टरमध्ये स्वत:ला गैरहजर असल्याचे पाहिल्यानंतर शुक्रवारी ती तक्रार करण्यासाठी मुख्याध्यापकांकडे गेले. त्याची तक्रार ऐकून मुख्याध्यापक संतापले आणि त्यांनी मुलांसमोर चक्क शिक्षिकेवर चप्पल काढली. मुख्याध्यापकांच्या या कृतीमुळे शिक्षकसंघही संतापलाय आणि या प्रकरणावर जाहीर निषेध व्यक्त करत आहे.

हेही वाचा: Gujrat Riots: मोदींनी भगवान शंकराप्रमाणे विषप्राशन केलं - अमित शाह

मुख्याध्यापक अचानक आक्रमक झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते. यात लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान शिक्षिकेनेसुद्धा मुख्याध्यापकांना स्वतःच्या चपलेनेमारहाण करण्याचा प्रयत्न केला, मात्र लोकांनी त्याला वेळीच रोखले.

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेजारी उभ्या असलेल्या कोणीतरी तयार करून सोशल मीडियावर टाकला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय.नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे.

Web Title: Principal Beat Female Teacher With Slippers In School Video Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top