esakal | शेतीच्या प्रत्येक गरजेला प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी । Modi
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी

शेतीच्या प्रत्येक गरजेला प्राधान्य - पंतप्रधान नरेंद्र मोदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशातील शेतकऱ्यांची प्रत्येक छोटी-मोठी गरज ही आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. बदलत्या हवामानात टिकून राहणाऱ्या विविध पिकांच्या ३५ वाणांचे मोदींच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. ही नवी वाणे देशातील शेतकऱ्यांना आम्ही समर्पित करत आहोत असेही त्यांनी नमूद केले. दुसरीकडे दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत केंद्र सरकारची उदासीन भूमिका कायम असून आजही मोदींनी याबाबत थेट भाष्य करणे टाळले.

हेही वाचा: ‘अभियांत्रिकीचा निकाल लवकर लावा’

मोदी म्हणाले की, ‘‘ पोषणयुक्त बियाण्याला प्राधान्य देणे आणि बदलत्या हवामान परिस्थितीशी अनुकूल बियाणे तयार करण्यावर सरकारचा भर राहील. पेरणी जेवढी खोल केली जाईल तेवढेच उत्पादनही जास्त येते अशी जुनी म्हण आहे. आमच्या वैज्ञानिकांनी अथक संशोधन करून विकसित केलेली ही नवीन बियाणे जलवायू परिवर्तनाच्या धोक्यांपासून पिकांना संरक्षण देण्यास तसेच सुरक्षित पिकांसाठी व कुपोषणमुक्त भारत मोहिमेला बळ देण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतील.’’

हेही वाचा: गुलाबनंतर 'शाहीन' चक्रीवादळाचा धोका, महाराष्ट्र-गुजरातला अलर्ट

"देशाच्या विविध भागांत वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती आहे. शेतीसमोर वेगवेगळी आव्हाने आहेत. नव्या वाणांमुळे शेतकऱ्यांना समस्यांना सामोरे जाण्यासाठी एक सशक्त साधन मिळेल. शेतीला सुरक्षा कवच मिळाल्याने देशाचाही विकास होईल."- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संशोधन संस्थेचाही उल्लेख

छत्तीसगडच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पायोटेक स्ट्रेस मॅनेजमेंटच्या रूपाने नवीन वैज्ञानिक संस्था मिळाली आहे. हवामान बदल व अन्य आव्हानांपासून पिके वाचविण्यासाठी ही संस्था संशोधन करेल. येथे जे वैज्ञानिक तयार होतील, ते जे संशोधन करतील ते देशाचे कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सहाय्यक बनतील. गतवर्षी पिकांवर टोळधाडीने हल्ला चढविला होता. भारताने ही टोळधाड थोपविली. ही नवी वाणे हवामान बदलांच्या आव्हानांचा सामना करू शकतील. यामध्ये पौष्टिक तत्त्वांचा समावेश आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top