Video : बसने चिरडले 25 विद्यार्थ्यांना, पाहा अपघाताचा थरार

वृत्तसंस्था
बुधवार, 18 डिसेंबर 2019

बसचा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या रिक्षालाही धडक दिली.

चेन्नई : तमिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यात एका खासगी बसने रस्त्याने चालत असलेल्या सुमारे 25 विद्यार्थ्यांना चिरडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या अपघातात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

(सौजन्य - आज तक)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्याकुमारी जिल्ह्यात हा भीषण अपघात झाला आहे. 11 डिसेंबरला एका छोट्या रस्त्यावरून विद्यार्थी जात असताना मागून आलेल्या बसने विद्यार्थ्यांना चिरडले. समोरून येणाऱ्या बसला रस्ता देण्याच्या प्रयत्नात चालकाने बसवरील नियंत्रण सुटल्याने थेट विद्यार्थ्यांना चिरडत ही बस पुढे गेली.

नाट्यवादळ विसावले!

बसचा हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बसने रस्त्याच्या बाजूला असलेल्या रिक्षालाही धडक दिली. या अपघातात कोणाचा मृत्यू झाल्याची माहिती नसून, अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private bus hit almost 25 people bus stop Kanyakumari Tamilnadu