Priyanka Chaturvedi : संजय गायकवाडांच्या कृत्यावर प्रियांका चतुर्वेदींचा थेट वार; म्हणाल्या, 'कुणाल कामराने फक्त विनोद केला तर..'
Priyanka Chaturvedi News : चतुर्वेदी यांनी असा आरोप केलाय की, 'संजय गायकवाड यांच्याविरुद्ध कोणताही FIR दाखल करण्यात आलेला नाही आणि शिंदे गटातील नेत्यांविरोधात कुणीही भाष्य करत नाही.
नवी दिल्ली : राज्यसभा खासदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेत्या प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वर्तणुकीवर कठोर टीका करत महत्त्वपूर्ण विधान केलंय.