प्रियांका गांधी म्हणाल्या, आमच्या 'त्या' वाहनांवर भाजपचे झेंडे लावा; पण....

priyanka gandhi, bus politics in uttar Pradesh
priyanka gandhi, bus politics in uttar Pradesh

लखनऊ :  सध्याच्या परिस्थितीत राजकारण बाजूला ठेवून संकटात सापडलेल्या मजुरांची मदत करायला हवी, असे काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे. देशव्यापी लॉकडाउनमुळे शहरात वसलेला मजूर उत्तर प्रदेशच्या दिशेने पायी चालला आहे. त्याची मदत करण्याच्या उद्देशाने 1000 बस सेवेत रुजू करण्याबाबतचा प्रस्ताव काँग्रेसकडून ठेवण्यात आला होता. या मुद्यावरुन उत्तर प्रदेशमध्ये राजकारण सुरु असल्याचा आरोप भाजप-काँग्रेसने एकमेकांवर केल्याचे पाहायला मिळाले.

उत्तर प्रदेशमध्ये संकटजन्य परिस्थितीत दोन्ही पक्षात राजकारण सुरु असल्याची चर्चा रंगत असताना बुधवारी प्रियांका गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आम्ही मजूरांसाठी जी वाहने उपलब्ध करुन देत आहोत त्यावर भाजपचा झेंडा लावा, पण मजूरांना त्यांच्या घरापर्यंत सुखरूप पोहचवण्याची परवानगी द्या, अशा शब्दांत प्रियांका गांधी यांनी योगी आदित्यनाथ सरकारला बस सेवेसंदर्भातील मदत घेण्याची पुन्हा एकदा विनंती केली आहे. आम्हाला याचे श्रेय घ्यायची इच्छा नाही. आम्हाला फक्त मजुरांना संकटात मदत करायची आहे. तुम्ही श्रेय घेतले तरी हरकत नाही, पण मजुरांना घरी सोडण्यासाठी वाहनांना रस्त्यावर उतरवण्याची परवानगी द्या, असेही त्यांनी म्हटले आहे.     

यावेळी प्रियांका गांधी म्हणाल्या की, सध्याच्या परिस्थिती ही मजूर वर्गातील बांधवांसाठी संकटाचा काळ आहे. राजकारण बाजूला ठेवून आपण त्यांची मदत करायला हवी. आम्ही पायी घरची वाट धरलेल्या प्रत्येक मजुराच्या पाठीशी आहोत. त्यांना आवश्यक ती मदत करण्याचा प्रयत्न करु. काँग्रेसने आतापर्यंत 67 लाख लोकांची मदत केली असून यात 60 लाख यूपीतील मजूरांचा समावेश आहे, असेही प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.    

मजुरांसाठी काँग्रेसने बस सेवा देण्याचा प्रस्ताव योगी आदित्यनाथ सरकारसमोर ठेवला होता.  या प्रस्तावावरुन भाजप-काँग्रेस यांच्यात पत्रव्यवहाराच्या माध्यमातून उत्तर-प्रत्युत्तर अशा पद्धतीने राजकारण सुरु असल्याचे चित्र दिसले.  प्रियांका गांधी यांच्या कार्यालयाचा प्रस्ताव स्वीकारत बस सेवेच्या रुपात मदत घेण्याचे यूपी सरकारने मान्य केल्यानंतर काँग्रेसने बस अन्य राज्यातून येणार असल्याचे कारण सांगत ही सेवा पुरवण्यासाठी अवधी वाढवून मागितला होता. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने लखनऊमध्ये ही सेवा देण्यास तुमची असमर्थता दिसते, असे काँग्रेसला पत्राच्या माध्यमातून कळवण्यात आले होते.  

एवढेच नाही तर रायबरेलीच्या सदर मतदार संघाच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार अदिती सिंह यांनी आपल्या पक्षाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले होते. आपतकालीन संकटात अशा प्रकारच्या राजकारणाची गरज काय? एक हजार बसची जी यादी पाठवण्यात आली त्यात निम्म्याहून अधिक बसेस नादुरुस्त आहेत, असे ट्विट करत त्यांनी आपल्याच पक्षावर तोफ डागली होती.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com