JNU मध्ये विवेकानंदांच्या पुतळ्याचं अनावरण; विद्यार्थी संघटना करणार PM मोदींना विरोध 

narendra modi.
narendra modi.

नवी दिल्ली : आज गुरुवारी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील स्वामी विवेकानंदांच्या एका पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरंन्सिगद्वारे पार पडणार आहे. जेएनयूच्या प्रशासकीय विभागामध्ये संध्याकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. 

मात्र, या कार्यक्रमाला विरोध होत आहे. काही विद्यार्थी संघटनांनी या कार्यक्रमाला आपला विरोध दर्शवला आहे. हा विरोध करण्यासाठी जवाहरलाल नेहरु विद्यापीठ विद्यार्थी संघटनेने म्हणजेच जेएनयूएसयूने विद्यापीठाच्या उत्तर दिशेला असणाऱ्या प्रवेशदाराजवळ संध्याकाळी पाच वाजता आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच शिक्षण मंत्रालयाकडून प्रश्नांची उत्तरेही मागितली आहे. या आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की ते हे आंदोलन मोदी सरकारच्या शिक्षणविरोधी आणि विद्यार्थीविरोधी धोरणांचा विरोध करण्यासाठी करत आहेत. या पुतळ्याचे अनावरण म्हणजे उपलब्ध निधीचा अपव्यय असल्याचं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी प्रशासनाला घेरत हे आंदोलन आयोजित केलं आहे. 

यातील विद्यार्थ्यांनी म्हटलंय की, भाजप आणि त्यांची मातृसंघटना आरएसएस जेएनयूचा द्वेष करतात. तसेच जेएनयूची छबी ते देशद्रोही आणि तुकडे-तुकडे गँग या प्रकारची करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. 2016 मध्येही मोदींचा पुतळा जाळला होता. जर मोदी शेतकऱ्यांचं प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरत असतील हाच स्वामी विवेकानंदांचा मोठा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलंय. 

तसेच या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, आमचा विरोध निश्चितच स्वामी विवेकानंदांच्या विचारांना नाहीये. पण सरकारने नेहमीच प्राधान्यक्रम चुकवले आहेत. त्यांनी अनावश्यक गोष्टींवर निधी वाया घालवत मूलभूत गोष्टींना दुर्लक्ष्य केलं आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com