CAA Protest : लखनौत पोलिस चौकीलाच आग; आंदोलनाला हिंसक वळण

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी म्हटले आहे, की शहरात आज कलम 144 लागू करण्यात आले असून, कोणालाही समुहाने जमण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे, की त्यांनी आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजे. 

लखनौ : नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) सुरु असलेल्या आंदोलनाने हिंसक रुप घेतले असून, आज (गुरुवार) लखनौत झालेल्या आंदोलनावेळी पोलिस चौकीलाच आग लावण्यात आली. तसेच अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने सीएए आणि एनआरसी हे दोन कायदे लागू केले आहेत. सीएएनुसार पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानील बिगर मुस्लिम नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. मुस्लिमांचा यामध्ये समावेश नाही. या कायद्यावरून सध्या देशभर आंदोलन होत आहे. आज दिल्ली, बंगळूर, लखनौ, मुंबई या शहरांत तीव्र आंदोलन पाहायला मिळाले.

आणखी वाचा - फडणवीसांच्या भारुडाला, उद्धव ठाकरेंचे भारुडानेच उत्तर 

लखनौमध्ये झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलिसांनी शहरात जमावबंदीचे कलम 144 लागू करूनही मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला हिंसक वळम लागले. आंदोलकांनी अनेक गाड्यांना आग लावत पोलिस चौकीही जाळली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. 

दिल्ली ठप्प; इंटरनेटसेवा बंद, मेट्रोवरही परिणाम; CAA विरोधात आंदोलन तीव्र

पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी म्हटले आहे, की शहरात आज कलम 144 लागू करण्यात आले असून, कोणालाही समुहाने जमण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती आहे, की त्यांनी आपल्या मुलांना समजावून सांगितले पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Protesters torch police station in Lucknow several vehicles set ablaze