

Pune Tops India’s Livability Rankings
esakal
देशातील शहरांच्या राहणीमानाच्या दर्जावर आधारित आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ मध्ये नवीन माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रातील पुणे शहराने यंदा राहण्यासाठी सर्वोत्तम शहराचा मान पटकावला आहे. या सर्वेक्षणात शहरांच्या विविध पैलूंवर आधारित मूल्यमापन करण्यात आले असून, त्यात शिक्षण, आरोग्य सेवा, गृहनिर्माण, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि मनोरंजन सुविधा यांचा समावेश आहे. या निर्देशांकाच्या आधारे तयार झालेल्या यादीत महाराष्ट्रातील चार शहरे पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली आहेत.