
पंजाब सरकारनं आज तरणतारण आणि फिरोजपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवा दुपारपर्यंत बंद केली आहे.
Amritpal Singh : अमृतपाल सिंहचा बॉडीगार्ड गोरखा बाबाला अटक; पंजाब पोलिसांना मोठं यश
चंदीगड : खलिस्तान समर्थक आणि फुटीरतावादी अमृतपाल सिंग प्रकरणात (Amritpal Singh Case) पंजाब पोलिसांना (Punjab Police) मोठं यश मिळालंय.
अमृतपाल सिंगचा साथीदार तेजिंदर सिंग (Tejinder Singh) उर्फ गोरखा बाबा याला अटक करण्यात आलीये. गोरखा बाबा हा खन्नाच्या मलौद पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या मंगेवाल गावचा रहिवासी आहे.
गोरखा बाबा अमृतपालसोबत राहत होता. अजनाला प्रकरणातही त्याचं नाव असल्याचं सांगितलं जातं. गोरखा बाबा एकेकाळी अमृतपालचा बॉडीगार्डही होता. अमृतपाल प्रकरणाबाबत पंजाब पोलीस आज (गुरुवार) सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.
दरम्यान, पंजाब सरकारनं आज तरणतारण आणि फिरोजपूर जिल्ह्यात इंटरनेट आणि एसएमएस सेवा दुपारपर्यंत बंद केली आहे. मोगा, संगरूर, अमृतसरमधील अजनाला उपविभाग आणि मोहालीच्या काही भागात निर्बंध हटवण्यात आले आहेत. 21 मार्चला पंजाबच्या इतर भागात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली.