esakal | पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सिद्धूंचा मार्ग मोकळा; कॅप्टन राजी?
sakal

बोलून बातमी शोधा

पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सिद्धूंचा मार्ग मोकळा; कॅप्टन राजी?

काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीष रावत शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भेटण्यासाठी चंदिगढला गेले होते.

पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सिद्धूंचा मार्ग मोकळा; कॅप्टन राजी?

sakal_logo
By
सूरज यादव

चंदिगढ - पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला अंतर्गत कलह आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. सूतरांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी काँग्रेसनं सुचवलेल्या पर्यायाला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता नवज्योत सिंह सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष केले जात आहे. यासाठी काही अटी ठेवण्यात आल्याचंही समजते.

काँग्रेसचे पंजाब प्रभारी हरीष रावत शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना भेटण्यासाठी चंदिगढला गेले होते. त्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनीही प्रस्तावावर सहमत असल्याचं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनिया गांधीनी घेतलेला निर्णय कॅप्टन यांनीही मान्य केला असल्याचं वृत्त एनडीटीव्हीने दिलं आहे.

हेही वाचा: दुबई-मुंबईच्या विमानात बॉम्बच्या धमकीनं खळबळ!

चंदिगढमध्ये शनिवारी कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पक्षाचे प्रभारी हरीश रावत यांची बैठक सुरु होती. तर दुसरीकडे नवज्योत सिंग सिद्धू सकाळी पटियालातून चंदिगढला पोहोचले होते. त्यांनी मंत्र्यांसह आमदारांच्या घरी जावून भेटी घेतल्या. सिद्धूंच्या या गाठीभेटींचा अर्थ प्रदेशाध्यक्ष पदासाठी इतर नेत्यांचा पाठिंबा मिळवण्याची धडपड असल्याचं म्हटलं जात आहे. तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा निर्णय मान्य असल्याचं म्हटल्यानं सिद्धूंच्या प्रदेशाध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे.

loading image