

Nawanshahr Murder News
ESakal
पंजाबमधील नवांशहर येथील एका खळबळजनक हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत केला. नवांशहर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आणि किराणा दुकानदार रवी सोबती यांची केवळ हत्या करण्यात आली नाही तर पुरावे नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून त्यांची गाडीही जाळण्यात आली. धक्कादायक म्हणजे, या कटामागील सूत्रधार घरकाम करणारी सोनम आणि तिचा दाजी सुरजीत सिंग उर्फ जस्सी होते.