

Punjab Police ASI Suspended
ESakal
अमली पदार्थांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच ड्रग्ज लपवून ठेवल्याचा गंभीर आरोप झाल्याने पंजाबमध्ये खळबळ उडाली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी महंत कश्मीर गिरी यांच्या घरात ड्रग्जचे पाकीट ठेवल्याचा प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला (ASI) तातडीने निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे.