Menstrual Leave : मुलींना मासिक पाळी दरम्यान मिळणार सुट्टी, या राज्यातील विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय

Punjab University Periods Holiday: पंजाब विद्यापीठाने विद्यार्थिनींच्या सोयीसाठी मासिक पाळीदरम्यान एक दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींना आगामी शैक्षणिक सत्र 2024-25 पासून अटी व शर्तींसह सुट्टी दिली जाईल, असे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले आहे.
Menstrual Leave
Menstrual LeaveEsakal

Punjab University Periods Holiday: मासिक पाळीदरम्यान तरुणींमध्ये शारीरिक आणि मानसिक थकवा येतो अनेकांना त्रास होतो. मासिक पाळीदरम्यान आरामाची गरज असते. मासिक पाळीवेळी मुलींना आराम मिळावा यासाठी पंजाब राज्यातील विद्यापिठाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा (Menstrual Leave) देण्याचा निर्णय पंजाब विद्यापिठाने (Punjab University) घेतला आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी विद्यापिठाने हा नवा नियम लागू केला आहे.

पंजाबमध्ये पहिल्यांदाच विद्यापीठाने मासिक पाळीच्या रजेचा मोठा पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती देणारे परिपत्रक विद्यापीठाने जारी केले असले तरी विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत.

पंजाब युनिव्हर्सिटी, चंदीगडच्या कुलगुरूंनी सांगितले आहे की आगामी शैक्षणिक सत्र 2024-25 पासून विद्यार्थिनींना अटी व शर्तींसह रजा दिली जाईल, परंतु ही रजा फक्त एक दिवसासाठी दिली जाईल. रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रथम विभागीय कार्यालयात उपलब्ध फॉर्म भरावा लागेल. फॉर्म सबमिट करण्यासाठी विद्यार्थ्याला रजेची परवानगी मिळेल. म्हणजेच, कॅलेंडरनुसार, एक विद्यार्थींनी मासिक पाळीमुळे एका महिन्यात एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकते. विद्यार्थींनीला ती किमान १५ दिवस अभ्यासासाठी आली असेल या अटीवर सुट्टी दिली जाईल. नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला चार दिवस सुट्टी दिली जाईल.

Menstrual Leave
Harmonal Imbalance : शरीरातील हार्मोनल असंतुलनाकडे करू नका दुर्लक्ष, 'या' आयुर्वेदिक वनस्पतींपासून मिळेल आराम

फक्त एक दिवस सुट्टी

मासिक पाळीसाठी रजा फक्त सामान्य दिवसात दिली जाईल. मुलींना परीक्षेदरम्यान या रजेसाठी अर्ज करता येणार नाही. रजेची परवानगी अध्यक्ष/संचालकांकडून दिली जाईल. विद्यार्थ्याने स्व-प्रमाणपत्राच्या आधारे रजा दिली जाईल. विद्यार्थींनीला पाच कामकाजाच्या दिवसांच्या आत अनुपस्थितीच्या रजेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यानंतर विद्यार्थींनीची हजेरी आणि सुट्ट्या तपासल्या जातील. रजा ठराविक महिन्यातील फक्त एका दिवसासाठी दिली जाईल, रजा कोणत्याही कारणास्तव वाढवता येणार नाही.

Menstrual Leave
फक्त मासिक पाळीचा त्रास म्हणून तिने स्वतःला संपवलं? मासिक पाळी आणि मानसिक आरोग्य यांचा समतोल कसा साधावा?

या विद्यापीठांमध्ये मासिक पाळीमध्ये मिळते रजा

याआधी केरळचे कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे देशातील पहिले विद्यापीठ होते, ज्याने जानेवारी 2023 मध्ये मासिक पाळीत सुट्टी सुरू केली होती. आसामचे गुवाहाटी युनिव्हर्सिटी, NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉ हैदराबाद आणि तेजपूर युनिव्हर्सिटी ऑफ आसाम यांनी रजा दिली आहे.

Menstrual Leave
Health Care News : मासिक पाळीत जाणवतोय जास्त थकवा? मग लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' बदल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com