

Putin Arrives in India for BRICS Summit 2026
esakal
१८व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन शुक्रवारी (११ सप्टेंबर) पहाटे भारतात दाखल झाले. नवी दिल्लीतील पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी पुतिन यांचे स्वागत केले. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक होणार असून, भारत-रशिया संबंधांच्या दृष्टीने या चर्चेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.