

vladimir putin
esakal
Russian President Vladimir Putin offers India: पश्चिम आशियात होर्मुझच्या सामुद्रधुनीपासून तांबड्या समुद्रापर्यंत निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि व्यापारावर मोठा ताण आला आहे. या जागतिक व्यापार संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे भारताची ऊर्जा आणि व्यापारी सुरक्षा अधिक बळकट होण्यासोबतच होर्मुझच्या मार्गावरील एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यास मदत होऊ शकते.