राफेल प्रकरण पुन्हा ऐरणीवर; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राफेल प्रकरण पुन्हा ऐरणीवर; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

नवी दिल्ली : राफेल प्रकरणावरुन मोदी सरकार चांगलंच अडचणीत आलं होतं. राफेलच्या खरेदीमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. दरम्यानच्या काळात भारतात राफेल फायटर विमान खरेदी व्यवहार प्रकरण शांत झालं होतं. पण आता मोदी सरकारच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण फ्रान्समध्ये या व्यवहारांची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.

राफेल प्रकरण पुन्हा ऐरणीवर; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
पंजाब मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आपचं आंदोलन; पोलिसांनी केला पाण्याचा मारा

या पार्श्वभूमीवर भारतात आता पुन्हा एकदा राफेलवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल सुरु केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात ट्विटरवर एक सूचक असं ट्विट करुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी ट्विटवरवर 'चोर की दाढ़ी…' असं लिहलंय आणि त्याखाली #RafaleScam असं म्हटलंय.

दुसरीकडे काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी थेट पंतप्रधान मोदींवरच टीका केलीय. फ्रान्सची वेबसाईट 'मीडियापार्ट'च्या रिपोर्टचा हवाला देत सुरजेवाला यांनी म्हटलंय की, रिलायन्स-डसॉल्ड डीलचे सगळे पुरावे सार्वजनिक करण्यात आले आहेत. मोदी सरकारची ही 'स्विटहर्ट डील' आता सुस्पष्ट झाली आहे. आतातरी पंतप्रधान मोदी संयुक्त संसदीय समितीला तपासासाठी परवानगी देतील का? असा रोखठोख सवाल त्यांनी केलाय.

राफेल प्रकरण पुन्हा ऐरणीवर; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
फ्रान्समध्ये राफेल व्यवहाराची चौकशी होणार, तपासासाठी न्यायाधीशाची नियुक्ती

काय आहे हे प्रकरण?

२०१६ साली फ्रान्सने भारताबरोबर ३६ राफेल फायटर विमाने विक्रीचा करार केला. या करारात भ्रष्टाचार आणि पक्षपात झाल्याचा आरोप होत असून फ्रान्समध्ये आता या व्यवहाराची चौकशी होणार आहे. ७.८ अब्ज युरो म्हणजे ५९ हजार कोटींच्या व्यवहाराची न्यायिक चौकशी करण्यासाठी फ्रान्समध्ये एका न्यायाधीशाची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकार आणि राफेलची निर्मिती करणाऱ्या डासूमध्ये झालेल्या करारात भ्रष्टाचार आणि पक्षपात झाल्याचा आरोप होतोय, त्याची चौकशी करण्यात येईल, असे फ्रान्सच्या आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले. स्वतंत्र न्यायदंडाधिकारी या प्रकरणाचा तपास करेल. अन्य घटकांबरोबर फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष फ्रान्सवा ओलांदे यांची कृती आणि निर्णयही तपासले जातील, असे फ्रेंच पब्लिकेशन मिडीयापार्टने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com